Wed, Apr 24, 2019 02:18होमपेज › Pune › २८ हजार मिळकतींची कर सवलत होणार रद्द

२८ हजार मिळकतींची कर सवलत होणार रद्द

Published On: Feb 20 2018 1:55AM | Last Updated: Feb 20 2018 1:55AMपांडुरंग सांडभोर

पुणे : प्रतिनिधी

शहरातील जवळपास 28 हजारांपेक्षा अधिक मिळकतींना (सदनिका) महापालिकेकडून मिळकतकरात दिली जाणारी 40 टक्क्यांची सवलत रद्द होणार आहे. या मिळकतींचा व्यावसायिक वापर होत असल्याचे प्रशासनाने केलेल्या पाहणीत  आढळून आले आहे.  येत्या आर्थिक वर्षापासून सवलत रद्द करण्याची कारवाई होणार आहे.

पुणे महापालिकेच्या हद्दीत 8 लाख मिळकती आहेत. त्यात निवासी व व्यावसायिक अशा स्वरूपाच्या मिळकतींचा समावेश आहे. पालिकेकडून दरवर्षी या मिळकतींना त्यांच्या स्वरूपानुसार करआकारणी केली जाते. 

ज्या मिळकतींचा व्यावसायिक वापर आणि वापरात बदल झाल्याचे आढळून आले आहे त्यांना दिली जाणारी सवलत नियमानुसार रद्द करण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे. एप्रिलपासून संबंधित मिळकतधारकांना सवलत रद्द करून बिले दिली जातील.   - विलास कानडे करआकारणी व करसंकलन प्रमुख, पुणे, मनपा