Tue, Sep 25, 2018 01:44होमपेज › Pune › रिंगरोडसाठी अडीच हजार कोटी

रिंगरोडसाठी अडीच हजार कोटी

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 13 2018 1:19AMपुणे : प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या ‘भारतमाला’ योजनेच्या माध्यमातून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) प्रस्तावित रिंगरोडसाठी केंद्र शासनाकडून 2 हजार 468 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती ‘पीएमआरडीए’चे आयुक्‍त किरण गित्ते यांनी सोमवारी दिली. 

‘पीएमआरडीए’च्या वतीने शहराभोवती 129 किलोमीटर अंतराचा रिंगरोड तयार केला जात आहे. पहिल्या टप्प्यात 32 किमी अंतराच्या रस्त्याला मान्यता मिळाली असून, 12 कि.मी.ची जागा पीएमआरडीएच्या ताब्यात आली आहे. ‘पीएमआरडीए’तर्फे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचआय) रिंगरोडसाठी 2 हजार 468 कोटींचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास मंजुरी मिळाली असून, 2018-19 या वर्षासाठी केंद्राने अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद केली आहे. भारतमाला योजनेंतर्गत देशभरातील 28 रिंग रोडसाठी निधी मंजूर केला आहे. करण्यात आला असून, त्यात पुणे आणि बंगळूरूच्या रिंगरोडचा समावेश आहे.

‘पीएमआरडीए’चा 129 कि.मी. लांबीचा आणि 100 मीटर रुंद वतुर्ळाकार रिंगरोड ‘एनएचआय’कडून करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 17 हजार कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. ‘एनएचआय’कडून ‘पीएमआरडीए’च्या देखरेखीखाली रिंगरोडचे काम केले जाणार असून, त्यासाठी केंद्राकडून 2 हजार 468 कोटी रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात होणार्‍या 32 कि.मी. रिंगरोडमुळे सातारा, नगर आणि सोलापूर येथून येणार्‍या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. मात्र, पुढील काळात रिंगरोडमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटणार आहे.