Sat, Jul 20, 2019 10:50होमपेज › Pune › अपघातातील मृतदेह अडीच तास रस्त्यावर पडून

अपघातातील मृतदेह अडीच तास रस्त्यावर पडून

Published On: May 14 2018 7:21PM | Last Updated: May 14 2018 7:21PMपौंड : वार्ताहर

कुळे (ता. मुळशी) येथे झालेल्या अपघातात योगेश विलास कदम (वय.२५ रा.वाळेण) याचा मृत्यू झाला. अपघातानंतर मदतकार्य लवकर मिळू शकले नसल्याने मृतदेह अडीच तास रस्त्यावर पडून होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. पोलिस वेळेवर न आल्याने येथील नागरिकांनी रस्ता रोको करत निषेध व्यक्त केला. 

कोळवण भागातील जवळपास एक हजारापेक्षा जास्त नागरिक येथे उपस्थित असून, येथे तपासणीसाठी आलेल्या एका पोलिसाबरोबर नागरिकांनी वाद घातला. अपघातात डोक्यावरून वाहन गेल्याने मयत तरूणाच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला होता. 

Tags : youth, killed, accident, kule mulashi, pune news