Wed, Mar 20, 2019 02:55होमपेज › Pune › राज्यातील २५ गावे समृद्ध- स्वयंपूर्ण होणार

राज्यातील २५ गावे समृद्ध- स्वयंपूर्ण होणार

Published On: Jan 11 2018 1:28AM | Last Updated: Jan 10 2018 11:11PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  तीन वर्षात राज्यातील 25 गावे पर्यावरण समृद्ध-स्वयंपूर्ण (मॉडेल) करण्याचा संकल्प अटल प्रतिष्ष्ठानने सोडला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी पत्रकार शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.  दरम्यान, मराठवाड्यातील परळी,पुण्यातील आंबेगाव,वेल्हे, मानखटाव अदी भागातील दिड हजार ते अडिच  हजार लोकसंख्या असणारी 25 गावे तीन वर्षात (एक हजार दिवस) एक मॉडेल म्हणून विकसीत करण्याचा प्रयत्न प्रतिष्ठान करत असल्याचे अध्यक्ष नकुल पार्सेकर  यांनी सांगितले. 

वर्षभर गावच्या विकासाठी आवश्यक असलेल्या विषयावर दर महिन्याला एका विषयावर कार्याशाळा घेतली जाणार आहे. त्यात बदलत्या हवामानावर अतुल देऊळगावकर मार्गदर्शन करणार आहेत. त्यासोबतच प्रभाकर बमदेकर (ग्लोबल व्हिलेज प्लँनर), डॉ. सुरेश गंगावणे, राजशेखर पाटील, रमेशलाल दायमा, संतोष भंडारी, सुजीत चक्रवर्ती,बिर्जे विद्याधर, प्रदीप लोखंडे, झिया उल हुडा, डॉ. हेमंत बेडेकर, विवेक बापट आणि अननिकेत लोहिया हे तज्ज्ञ आपापल्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. नव्या पिढीला जीवनसुरक्षा देण्याचा मार्ग शोधावा लागणार असून तेच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची ‘अंत्योदय से भारत निर्माण’ ही संकल्पना पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे.