Wed, Nov 14, 2018 02:37होमपेज › Pune › यशवंत निवारा योजनेतर्गत  २५ घरकुलांना मंजुरी

यशवंत निवारा योजनेतर्गत  २५ घरकुलांना मंजुरी

Published On: Jan 12 2018 1:55AM | Last Updated: Jan 12 2018 1:08AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

जिल्ह्यातील अपंगांना निवारा उपलब्ध करण्यासाठी यशवंत निवारा योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यातील 25 लाभार्थ्यांची घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. 2017-18 कालखंडात इंदापूर तालुक्यातील मागासवर्गीय गरजू अपंगांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. प्राप्‍त अर्जांची छाननी करून घरकुल योजनेस मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली आहे.

अपंग नागरिकांना हक्काचा निवारा उपलब्ध होण्यासाठी शासनाच्या वतीने यशवंत निवारा आवास योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार इंदापूर तालुक्यातील अनेक गावांतून अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 25 घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान प्रत्येक पात्र आणि गरजू लाभार्थ्याला घरकुल मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे माने यांनी सांगितले. दरम्यान अधिक माहितीसाठी समाजकल्याण विभागाचे प्रवीण कोरगंटीवार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.