Sat, Sep 22, 2018 20:38होमपेज › Pune › मुलगा होण्यासाठी भोंदू महिलेने घातला २५ लाखाला गंडा

मुलगा होण्यासाठी भोंदू महिलेने घातला २५ लाखाला गंडा

Published On: Feb 05 2018 11:53AM | Last Updated: Feb 05 2018 11:53AMपुणे : प्रतिनिधी

दोन मुलीनंतर मुलगा होण्यासाठी आणि घरावर संकट येणार असल्याची भीती दाखवत एका भोंदू महिलेल्या साथीने एका कुंटुबास तब्बल २५ लाखाचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हडपसर येथील परिसरात ही घटना घडली असून, याप्रकरणी सुनील सरोज आणि अनोळखी भोंदू महिलेवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर कामठे यांनी याबाबत फिर्याद दिली.

याबाबत अधिक माहिती अशी, समीर कामठे यांचे किरणा दुकान असून आहे. त्यांना दोन मुली असून ते आपल्या कुटुंबासोबत राहतात. समीर यांचे वडील नोकरीस असून त्यांची सुनिल सरोज याची ओळख होती. समीर यांना तिसरा मुलगाच व्हावा यासाठी सुनिल यांने त्याच्या वडीलास एका भोंदू महिलेकडे नेले. या महिलेले कामठे कुटुंबास वेळोवेळी भिंती घालत आता पर्यंत 25 लाखाचा गंडा घातला.