पुणे : दिवाळीत एसटीच्या २४०० फेर्‍या : उत्पन्नात वाढ

Last Updated: Nov 09 2019 2:04AM
Responsive image
संग्रहित फोटो


पुणे : प्रतिनिधी

एकीकडे एसटी तोट्यात असल्याचे बोलले जात आहे. पण आजही एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या तितकीच वाढत असल्याचे दिसत आहे. दिवाळीनिमित्त लोक गावाकडे आपल्‍या आप्तांकडे जात असतात. त्यामुळे या काळात एसटीतून प्रवास करण्यासाठी प्रवाशांची गर्दी वाढत असते. त्यामुळे नेहमीप्रमाणे यंदाही एसटीकडून १३०० अधिक बसेसचे नियोजन करण्यात आले होते. या गाड्यांनी २४०० फेर्‍यांचा टप्पा ओलांडला आहे. त्यातून मिळालेल्या महसुलामुळे एसटीची दिवाळीही गोड झाली आहे. 

यंदाच्या दिवाळीसाठी एसटी प्रशासनाकडून प्रारंभी १३०० जादा बसचे नियोजन करण्यात आले होते. मात्र २४ ते २७ ऑक्टोबर दरम्यान प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली. त्यामुळे प्रवाशांची गरज लक्षात घेऊन प्रशासनाने पुन्हा १०० बस वाढविल्या होत्या. मागील वर्षी दिवाळीच्या काळात १२०० ते १३०० जादा बसेसचे नियोजन करण्यात आले होते. या गाड्यांच्या २१०० फेर्‍या झाल्या होत्या. मागील वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत बसच्या ३०० फेर्‍या अधिक झाल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत मिळालेल्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ झाली असल्याची माहिती एसटीकडून देण्यात आली आहे.

रयतेचे राज्य आणण्यासाठी प्रयत्न करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


एकनाथ खडसे म्हणतात, 'म्हणून' ८० तासांसाठी फडणवीस मुख्यमंत्री झाले!


भाजपमधील खदखद गोपीनाथ गडावरून चव्ह्याट्यावर; चंद्रकातदादांनी करून दिली कुटुंबाची आठवण!


तान्हाजी’चे ‘माय भवानी’ गाणे रिलीज (video)


मी पक्ष सोडणार नाही; पक्षाने काय तो निर्णय घ्‍यावा : पंकजा मुंडे


गोपीनाथ गडावरून चंद्रकातदादांची 'नाराज' नाथाभाऊंना कळकळीची विनंती!


पंकजा मुंडेंचा पराभव स्वकीयांनीच ठरवून केला; एकनाथ खडसेंचे टिकास्त्र


मुंबई : केक खाल्ल्याने ३० जणांना विषबाधा


बापाने केला पोटच्या मुलीवर अत्याचार (video)


'रिझवान’चा संगीत अनावरण सोहळा उत्साहात संपन्न (video)