Sun, Aug 25, 2019 03:37होमपेज › Pune › पिंपरीत पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर खुनी हल्ला

पिंपरीत पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर खुनी हल्ला

Published On: Mar 09 2018 8:16AM | Last Updated: Mar 09 2018 8:22AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरीतील थेरगाव येथे पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर खुनी हल्ला करण्यात आला आहे. तिघांनी धारदार हत्यारांनी वार करुन तरुणाला संपवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास घडला.

यात रुपेश सोराती (24, रा. काळेवाडी) या तरुणावर वार करण्यात आले आहेत. जखमी रुपेश याच्यावर बिर्ला रुग्णालयात उपचार सुरु आहे.  याप्रकरणी राजेश सायरु याने फिर्यादीवरुन ईश्वर लोंढे, सोन्या डावरे, शुभम टकले व इतर पाच ते सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  वाकड पोलिस तपास करत आहेत.