Fri, Aug 23, 2019 14:35होमपेज › Pune › कल्याणकारी योजनांसाठी तब्बल २४ हजार अर्ज 

कल्याणकारी योजनांसाठी तब्बल २४ हजार अर्ज 

Published On: Dec 31 2017 1:48AM | Last Updated: Dec 31 2017 12:15AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागातून विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या कल्याणकारी योजनांसाठी 1 एप्रिल ते 28 डिसेंबर 2017 पर्यंत म्हणजे 9 महिन्यांत महापालिकेकडे तब्बल 23 हजार 931 अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी शुक्रवारी (दि.28) दिली. 

महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत महिला व बालकल्याण योजना, अपंग व्यक्तींच्या विकासाच्या योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना आणि इतर कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांसाठी महापालिकेकडून वेळोवेळी अर्ज मागविण्यात येतात. अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची छाननी करून लाभार्थीला लाभ दिला जातो. विविध कल्याणकारी योजनांतर्गत  1 एप्रिल ते 28 डिसेंबर 2017 पर्यंत महापालिकेकडे 23 हजार 931 अर्ज प्राप्त झाले आहेत.