पुणे : प्रतिनिधी
शहरात यावर्षी डेंग्यूचे 214 पॉझिटिव्ह रुग्ण, तर डेंग्यूसदृश 1,214 रुग्ण आढळून आले आहेत. त्यात ऑगस्ट महिन्यातच डेंग्यूचे 78, तर डेंग्यूसदृश 450 रुग्ण आढळले. आतापर्यंत दोन जणांचा डेंग्यूने मृत्यू झाला. जून महिन्यापासून रुग्णांची संख्या वाढत असून, जूनमध्ये 181, जुलैत 455 रुग्ण आढळून आले आहेत. दोन आठवड्यांपासून पाऊस सुरू असल्याने अडगळीची ठिकाणे, बांधकामे, नाले, पाणवठे आदी ठिकाणी पाणी साचून डेंग्यूच्या अळ्या तयार होत आहेत.