Mon, Apr 22, 2019 05:41होमपेज › Pune › कर्जमाफीचे शेतकर्‍यांच्या खात्यावर २१ हजार कोटी जमा : सहकार आयुक्त डॉ. झाडे 

कर्जमाफीचे शेतकर्‍यांच्या खात्यावर २१ हजार कोटी जमा : सहकार आयुक्त डॉ. झाडे 

Published On: Mar 11 2018 1:02AM | Last Updated: Mar 10 2018 11:24PMपुणे : प्रतिनिधी

राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या योजनेत सद्यस्थितीत सुमारे 46 लाख 52 हजार शेतकर्‍यांच्या बॅँक खात्यांवर 21 हजार 497 कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती सहकार आयुक्त डॉ. विजयकुमार झाडे यांनी दिली. ज्या शेतकर्‍यांच्या ऑनलाईन अजार्र्ंमध्ये त्रुटी आढळून आलेल्या अहेत, ती माहिती अद्ययावत करून माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडे पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

राज्य सरकारच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’अंतर्गत आतापर्यंत दीड लाख रुपये सरसकट कर्जमाफीचा लाभ मिळालेले 22 लाख 95 हजार शेतकरी आहेत. त्यांच्या खात्यात सुमारे 13 हजार 233 कोटी 12 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यात आलेला आहे.

उपविभागीय अधिकार्‍यांकडे अपिलाची संधी

पुणे जिल्ह्यातील सुमारे 3 लाख दोन हजार शेतकर्‍यांपैकी 1 लाख 51 हजार 714 शेतकर्‍यांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या. त्या त्रुटींमधील माहिती अद्ययावत राज्य सरकारकडे पाठविण्यात आली आहे. छाननीमध्ये पुन्हा अर्जात त्रुटी आढळून आल्यास उपविभागीय अधिकार्‍यांकडे शेतकर्‍यांना अपील करण्याचा मार्ग आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांपैकी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (पीडीसीसी) दोन लाख 20 हजार शेतकर्‍यांची खाती असल्याचे सहकार खात्याकडून सांगण्यात आले.