Fri, Jul 19, 2019 22:43होमपेज › Pune › ‘थेट डीवायएसपी बॅचमधील अधिकार्‍यांना ज्येष्ठता’

‘थेट डीवायएसपी बॅचमधील अधिकार्‍यांना ज्येष्ठता’

Published On: Mar 22 2018 5:09PM | Last Updated: Mar 22 2018 5:09PMपुणे : देवेंद्र जैन

महाराष्ट्र पोलिस दलातील १९९२ च्या  तुकडीच्या १४ पोलिस उप अधिक्षकांना (डी वाय एस पी) वर्ष २००४ ची ज्येष्ठता देण्याचा निकाल ‘कॅट’ न्यायालयाने दिला आहे. कॅटच्या या निकालामुळे मपोसे अधिकार्‍यांना न्याय मिळाला आहे.

या अधिकार्‍यांना नियमानुसार १ जानेवारी २०१८ पासून पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळणे गरजेचे होते. त्यामुळे या अधिकार्‍यांमधील काही अधिकार्‍यांनी शासनाच्या निर्णयाविरोधात ‘कॅट’ न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणीअंती ‘कॅट’ न्यायालयाने १९९२ च्या थेट डीवायएसपी बॅचमधील १४ अधिकार्‍यांना २००४ ची ज्येष्ठता देण्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे या अधिकार्‍यांना आता २००४ ची  ज्येष्ठता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

डी. वाय. एस. पींच्या १९९२ च्या तुकडीतील बॅचमधील १४ अधिकाऱ्यांना १ जानेवारी २०१७ पासूनची सेवा ज्येष्ठता (सिलेक्शन ग्रेड) मिळाली  आहे. यामध्ये बळीराम गणपत गायकर, सुनील फुलारी, संजय मोहिते, दत्ता कराळे, प्रवीण पवार, डॉ. प्रभाकर बुधवंत, सुप्रिया पाटील, अनंत रोकडे, अमर जाधव, संजय बावीस्कर, शेखर, आर. पी. नाईकनवरे आदी अधिकार्‍यांचा समावेश आहे. शासनाने य अधिकार्‍यांना अगोदरच २००५ ची ज्येष्ठता दिली आहे.

या निकालानंतर राज्य पोलिस दलातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या कामाला वेग आला आहे. गृहविभागाकडून वरिष्ठांच्या बदल्यांच्या फायलींवर शेवटचा हात फिरविण्यात येत असून, येत्या काही दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर होणार आहेत. राज्यातील पुणे, औरंगाबाद, नागपूर, नवी  मुंबई, ठाणे शहर आयुक्‍तालयातील आयुक्‍तांची बदली होणार असून, शासनाने पोलिस महानिरीक्षकांच्या ७ पदांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता महानिरीक्षकांची १३ पदे झाली आहेत त्‍यातील ११ पदे रिक्‍त आहेत तसेच अतिरिक्‍त महांचालकांच्या ४ जागा रिक्‍त आहेत. या जागा पदोन्नतीने भरल्या जाणार असल्यामुळे ज्येष्ठता मिळालेल्या अधिकार्‍यांना याचा लाभ होणार आहे.  

सोलापूरचे पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, पुण्याचे अधीक्षक सुवेज हक, संजय दराडे, शारदा राऊत, मनोज शर्मा यांना सन २००५ ची ज्येष्ठता देण्यात आली आहे. परंतु, कॅटच्या निकालामुळे या अधिकार्‍यांना पदोन्नतीसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे मपोसे असलेले अधिकारी हे सिनियर झाले असून, थेट आयपीएस असणारे अधिकारी ज्युनियर झाले आहेत.

Tags : CAT court, sub inspector, sub divisional, officers  Maharashtra police force