Sun, Apr 21, 2019 13:47होमपेज › Pune ›

आभासी चलनात तब्बल २०० कोटींची उलाढाल!

आभासी चलनात तब्बल २०० कोटींची उलाढाल!

Published On: Apr 05 2018 2:12AM | Last Updated: Apr 05 2018 1:16AMपुणे : अक्षय फाटक

देशभरातील बड्या हसतींसह सर्वसामान्यांना भुरळ घालणार्‍या आभासी चलनात (बीटकॉईन, क्रिप्टो करन्सी, इथर, एमकॉप) एकट्या पुण्यात जवळपास एक हजार जणांनी पैसे गुंतविले आहेत. तर, देशभरात तब्बल दोनशे कोटींच्या जवळपास उलाढाल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, दिल्लीतून हे रॉकेट चालविले जात होते. 

भारतासह जगभरात या आभासी चलनाने धुमाकूळ घातला आहे. कमी वेळेत मोठ्या परताव्याचे अमिष दाखविले गेले. त्यामुळे अनेकांकडून याला पंसती दिली. उच्चभ्रुंसह बड्या आसामी आणि सर्वसामान्यांनी यात मोठ्या रक्कमा गुंतविल्या. तर, काही जणांनी नातेवाईक, मित्र तसेच उसनेवारीवर पैसे गोळा करून यात गुंतविले. मात्र, त्यानंतर यातील गुंता वाढत गेला आणि हा आभासी चलनाचा फुगा फुटला. त्यातच या आभासी चलनात फसवणूक झाल्याबाबात महाराष्ट्रात तीन ठिकाणी गुन्हे दाखल झाले. त्यानंतर तक्रारदारांची संख्या आणि फसवणुकीचा आकडा वाढत गेला. तक्रारदारांची संख्या कमी आहे, पण, त्यातील फसवणुकीची रक्कम पाहिल्यानंतर सर्वांचे डोळे मोठे झाले. हे आभासी चलन साखळी पद्धतीने चालविली जात होते. दिल्लीतून हे रॉकेट चालविल्याचे समोर आले आहे.  दरम्यान कमी वेळेत पैशांच्या आकर्षनापोटी पुणेकरही या आभासी चलनात ओढले गेले. नोकरदारांसह सर्वसामान्यांनी यात पैसे गुंतविले. आतापयर्र्ंत 27 तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. दरम्यान एका बिटकॉनची किंमत 5 लाख असल्याचेही समोर आले आहे.

एमकॉपची किंमत 13 रुपये आहे. पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. त्यातूनही माहिती समोर आली आहे. मात्र, एकट्या पुण्यात एक हजारांच्या जवळपास नागरिकांनी या आभासी चलनात पैसे गुंतविल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर, आरोपींनी 20 कोटीं रुपयांचे उलाढाल केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. देशभरातील 8 हजार नागरिकांनी पैसे गुंतविल्याचे समोर आले असले तरी, तब्बल दोनशे कोटींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यानंतर आणखी काही धक्क्कादायक माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे. 

Tags : Pune, 200 crore, turnover,  virtual currency