होमपेज › Pune › दोन वर्षे इंटरनेटसाठी 2 कोटी 11 लाख

दोन वर्षे इंटरनेटसाठी 2 कोटी 11 लाख

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 16 2018 10:54PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध कार्यालयांसाठी इंटरनेट बॅण्ड विड्थ व एमपीएलएलद्वारे इंटरनेट सुविधा पुरवली जाणार आहे. ही सुविधा रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडकडून 2 वर्षांसाठी घेण्यात येणार असून, त्यासाठी 2 कोटी 10 लाख 85 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या सभेत या विषयाला मंजुरी देण्यात आली. पालिका व इतर कार्यालये इंटरनेटने जोडण्यात येणार आहेत. या इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने निविदा प्रसिद्ध केली होती. त्यास रिलायन्स जिओ इन्फोकॉमने तब्बल 50.13 टक्के कमी दर दिला आहे. तर, रिलायन्स कम्युनिकेशनने 30.09 टक्के आणि भारत संचार निगमने 29.04 टक्के कमी दर सादर केला. 
रिलायन्स जिओने सर्वांत कमी दर दिल्याने त्यांचा दर स्वीकारण्यात आला आहे. पहिल्या वर्षासाठी 1 कोटी 11 लाख 99 हजार 809 रुपये व दुसर्‍या वर्षी 98 लाख 85 हजार 734  रुपये  असे एकूण 2 कोटी 10 लाख 85 हजार 543 रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. अंतिम मंजुरीसाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेकडे शिफारस करण्यात आली आहे.