Wed, Jun 26, 2019 11:29होमपेज › Pune › वारंवार गैरहजर राहणार्‍या 158 चालकांना घरचा रस्ता 

वारंवार गैरहजर राहणार्‍या 158 चालकांना घरचा रस्ता 

Published On: Jan 16 2018 2:15AM | Last Updated: Jan 16 2018 12:58AM

बुकमार्क करा
पुणे :प्रतिनिधी :

पीएमपीच्यासेवेत हंगामी बदली चालक या पदावर कार्यरत असलेल्या सुमारे 158  कर्मचार्‍यांना वारंवार गैरहजर राहत असल्याचा ठपका ठेवत  पीएमपीचे  अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी कामावरुन कमी  केले आहे.

पीएमपीचे अध्यक्ष मुंढे यांनी मागील दोन दिवसांपूर्वीच कामात हलगर्जीपणा केल्याचा ठ्पका ठेवत सुमारे 13 वाहतुक निरीक्षकांना निलंबित केले. त्यानंतर तत्काळ सुमारे 158 चालकांना शनिवारी निलंबित केल्यामुळे  कर्मचा-यामध्ये  खळबळ उडाली आहे. मुंढे यांनी आतापर्यंत सुमारे 200 जणांवर कारवाई करून त्यांना निलंबित केले आहे. कामात हलगर्जीपणा करणा-या कर्मचा-यांवर   दंडात्मक तसेच निलंबनाची कारवाई केली जाते.  तसेच सातत्याने गैरहजर राहणे, बेशिस्त वर्तन आणि इतर मुद्यांच्या ठपका ठेवण्यात आलेले अजुन  सुमारे 377 कर्मचा-यांची चौकशी सुरू आहे.कर्मचा-यांनी महिन्यातील किमान 21 दिवस कामावर उपस्थित राहणे बंधकारक आहे. दरम्यान निलंबित करण्यात आलेल्या कर्मचा-यांची पुरेशी हजेरी पुरेशी भरली नसल्यामुळे कारवाई करण्यात आलेली आहे.

शनिवारी 158 बदली हंगामी रोजंदारी चालकांवर कारवाई करण्यात आली. या कर्मचा-यांची ऑगस्ट ते डिसेंबर या पाच महिन्यांती हजेरी तपासण्यात आली. त्यामुळे त्यांची हजेरी 21 दिवसांपेक्षा कमी भरल्याने त्यांची चौकशी सुरू करण्यात आली होती. दरम्यान बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचा-यांना  म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. त्यांच्यावर ठेवण्यात आलेले आरोप सिध्द झाल्याने 158 जणांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आाला.