Thu, Jun 20, 2019 21:15होमपेज › Pune › बारावीचा निकाल लांबणार..? 

बारावीचा निकाल लांबणार..? 

Published On: Mar 22 2018 1:28PM | Last Updated: Mar 22 2018 1:28PMपुणे : प्रतिनिधी 

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी २६ मार्चला मंत्रालयासमोर उपोषणाचा निर्णय घेतला आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्यासोबत बुधवारी ( २१ मार्च ) रोजी आयोजित बैठकीत सकारात्मक चर्चा न झाल्याने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने पुन्हा आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. 

शिक्षकांनी त्यानुसार २६ मार्च रोजी मंत्रालयासमोर उपोषणाचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरही निर्णय न झाल्यास विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका आणि मार्कशिट  बोर्डाकडे जमा करणार नसल्याचे महासंघाचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे बारावी चा निकाल लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.