Mon, Apr 22, 2019 11:40होमपेज › Pune › जिल्ह्यातील ११६ अंपगानाच निवृत्तीवेतन

जिल्ह्यातील ११६ अंपगानाच निवृत्तीवेतन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

दारिद्य्ररेषेखाली अंपग कुटूंबांना इंदिरा गांधी राष्ट्रीय अंपग निवृत्ती येजनेअंतर्गत दरमहा 600 रुपये निवृत्ती वेतन दिले जाते. जिल्ह्यात वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्रमाणित केलेले सुमारे 20 हजार अंपग (कुटूंब) असून त्यापैकी केवळ 116 अंपगाना वेतन मिळत आहे. 

राज्य आणि केंद्र शासनाच्या वतिने दारिद्य्ररेषेखाली असलेल्या कुटूंबाना विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसाहय्य केले जाते. त्यातील इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन ही एक आहे. अपंग कुटूंबाचे नाव ग्रामीण किंवा शहरी भागाच्या दारिद्र्यरेषेखालील कुटूंबाच्या यादीत समाविष्ट असावे. शासनाच्या अन्य कोणत्याही मासिक योजनांचा लाभ घेतलेला नसल्यास त्याला  या  योजनेचा लाभ मिळू शकतो. अंपग व्यक्‍तीचे वय 18 ते 65 वयोगटातील 80 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असने आवश्यक आहे. अनुदान केंद्र शासन 200 रुपये आणि राज्य शासनाकडून 400 रुपये, असे 600 रुपये वेतन मिळते.

राज्या आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अंपग कुटुंबांना अर्थसाहय्य केले जाते. मात्र, या योजनांचा प्रसार आणि प्रचार योग्य पद्धतीने केले जात नाही. त्यामुळे योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोचत नाही. परिणामी अनेक अंपग अर्थसाहय्यापासून वंचित असून जिल्ह्यात केवळ 116 अंपगानाच इंदिरा गांधी राष्ट्रीय अंपग निवृत्ती वेतन मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वास्तविक पुणे शहर आणि जिल्ह्यात सुमारे 20 हजार अंपगांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले आहे. असे असताना केवळ 116 चा लाभार्थी कोणत्या निकषावर निवडण्यात आले आहे, असा सवाल प्रहार अंपग क्रांती आंदोलनाचे धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे.