Sat, Mar 23, 2019 16:06होमपेज › Pune › प्रत्येक वर्षी ‘स्थायी’वर ११ नवीन सदस्य

प्रत्येक वर्षी ‘स्थायी’वर ११ नवीन सदस्य

Published On: Feb 25 2018 1:16AM | Last Updated: Feb 24 2018 10:21PMपिंपरी : संजय शिंदे

भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असणार्‍या पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये स्थायी समितीवर 16 पैकी पक्षाच्या वाट्याला येणार्‍या 11 जागांवर दर वर्षी नवीन सदस्यांना संधी देण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला प्रदेशस्तरावरून हिरवा कंदील मिळाल्याचेविश्वसनीय वृत्त आहे. या निर्णयामुळे पाच वर्षांत 55 सदस्य आणि पाच जणांना स्थायी समिती अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळणार आहे. 

पालिकेच्या इतिहासात प्रथम भाजपचे कमळ फुलले आणि 77 नगरसेवक निवडून आले. महापौरपद आ. महेश लांडगे, तर स्थायी समिती अध्यक्षपद शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप समर्थकाला मिळाले.

स्थायी समितीच्या एकूण 16 जागांपैकी एका अपक्षासह 11 जागा भाजप, 4 राष्ट्रवादी काँग्रेस आणि 1 जागा शिवसेनेच्या वाट्याला आली. ‘स्थायी’च्या पारदर्शक कारभारामुळे आम्ही कररूपी पैशाची बचत केली, असा दावा स्थायी समिती अध्यक्षांकडून वारंवार करण्यात आला, तर समाविष्ट गावांतील विकासकामांच्या बरोबरच कचरा ठेकेदारीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.

त्यावरून पक्षांतर्गत मतभेद टोकाला गेले. त्यामध्ये अखेर मुख्यमंत्र्यांना  हस्तक्षेप करावा लागला. दरम्यान, नियमानुसार 16 पैकी 8 सदस्यांना ड्रॉच्या माध्यमातून बाहेर पडावे लागले. त्यामध्ये भाजपच्या सहा सदस्यांचा समावेश आहे; मात्र दि. 7 फेब्रुवारी रोजी सकाळी शहराध्यक्षांनी भाजपच्या वाट्याच्या सर्वच म्हणजे 11 जणांचे स्थायी समिती सदस्यपदाचे राजीनामे घेतले आहेत. नवीन सदस्यांना संधी द्यायची का जुना फॉर्म्युलाच पुढे ठेवायचा याचा निर्णय प्रदेशस्तरावर घ्यावा, असे सांगण्यात आले होते. 

त्यानुसार सारासार विचार करून प्रदेशस्तरावरून दर वर्षी नवीन 11 सदस्यांना ‘स्थायी’वर संधी देण्याच्या निर्णयाला मान्यता मिळाल्याचे समजते. त्यामुळे ड्रॉमध्ये जे नशीबवान ठरले होते त्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.