Tue, Oct 22, 2019 01:46होमपेज › Pune › १० वी-१२वी निकाल तारखा जाहीर नाहीत!

१० वी-१२वी निकाल तारखा जाहीर नाहीत!

Published On: May 06 2018 1:54AM | Last Updated: May 06 2018 1:31AMपुणे : प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे. अशातच सोशल मीडियावर बारावीचा निकाल 27 मे रोजी, तर दहावीचा निकाल 6 जून रोजी जाहीर होणार असल्याचे संदेश व्हायरल झाले आहेत.

त्या पार्श्‍वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने दहावी व बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख अद्यापपर्यंत जाहीर केलेली नसल्याने अनधिकृत तारखांवर विद्यार्थी व पालकांनी विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन शनिवारी प्रसिद्वीपत्रकाद्वारे केले आहे.

राज्य शिक्षण मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. अशोक भोसले म्हणाले, 10वी, 12वी परीक्षेच्या निकालाची तारीख मंडळामार्फत बोर्डाच्या  अधिकृत वेबसाईटवरून प्रसिद्ध करण्यात येईल.