होमपेज › Pune › गणेश जयंतीनिमित्त बनविला १०१ किलो वजनाचा मोदक

गणेश जयंतीनिमित्त बनविला १०१ किलो वजनाचा मोदक

Published On: Jan 21 2018 2:52AM | Last Updated: Jan 20 2018 11:09PMखडकी : वार्ताहर 

गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत गणपती नवा बाजार गणेशोत्सव मंडळाच्या वतीने 101 किलो वजनाचा मोदक तयार करण्यात आला आहे. मोदक चार फूट उंचीचा असून रविवारी गणेश जयंतीनिमित्त भक्तांना प्रसाद वाटप करण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सतीश चंद्रभान अग्रवाल यांनी सांगितले.

गणेश जयंतीनिमित्त 101 किलो वजनाचा खव्याचा मोदक तयार करण्यात आला आहे. मोदक बनविण्यासाठी चार दिवस लागले असून, वंदन स्वीटचे मुकेश अग्रवाल आणि प्रेम अग्रवाल यांनी तयार केला असल्याचे सतीश अग्रवाल यांनी सांगितले. 

चार फूट उंचीचा मोदक मंदिरात ठेवण्यात येणार असून रविवारी होम हवन नंतर प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. गणेश जयंतीनिमित्त मंडळाच्या वतीने भंडार्‍याचे आयोजन केले आहे. मंडळाचे पुरुषोत्तम खंडेलवार, आनंद अग्रवाल, अशोक राठोड, उमाकांत पाथरकर यांनी साहाय्य केले आहे.