Sun, Sep 23, 2018 13:48होमपेज › Pune › पुणे : ॲम्बीव्हॅली बलात्कार प्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी

पुणे : ॲम्बीव्हॅली बलात्कार प्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी

Published On: Jul 24 2018 6:16PM | Last Updated: Jul 24 2018 6:16PMपुणे : प्रतिनिधी 

कंपनीच्या कॉन्फरन्ससाठी अ‍ॅम्बीव्हॅली येथे आलेल्या दिल्ली येथील अकाऊंट एक्झुकेटिव्ह तरूणीवर बलात्कार प्रकरणी सुरक्षा रक्षकाला दहा वर्ष सक्तमजुरी आणि 7 हजार रूपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. धमेंद्रकुमार रामबाबुल चौधरी उर्फ सिंग असे शिक्षा झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. 10 डिसेंबर 2010 रोजी मुळशी तालुक्यातील अ‍ॅम्बीव्हॅली येथे तरूणीला चाकूचा धाक दाखवून बलात्कार करणार्‍यात आला होता. 

याप्रकरणी अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.