Fri, Jul 10, 2020 23:01होमपेज › Pune › शिक्षकाकडून दहा वर्षाच्या विद्यार्थीनीचा विनयभंग 

शिक्षकाकडून दहा वर्षाच्या विद्यार्थीनीचा विनयभंग 

Published On: Dec 08 2017 12:44PM | Last Updated: Dec 08 2017 12:44PM

बुकमार्क करा

बारामती : प्रतिनिधी  

तालुक्यातील शारदानगर येथे गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. दहा वर्षीय मुलीचा तिच्या शिक्षकानेच विनयभंग करत तिच्याशी लैंगिक चाळे केले आहे. सचिन साळुंखे असे या नराधम शिक्षकाचे नाव आहे.

गुरुवारी शाळेमध्ये ही घटना घडली. शिक्षकाविरोधात तालुका पोलिसांनी विनयभंगासह बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. 

संशयित शिक्षकाने लेझीम आणण्याच्या बहाण्याने पीडित मुलीला खोलीत नेत त्याने तिच्याशी लैंगिक चाळे केले. या प्रकाराने भेदरलेल्या मुलीने  शाळेतून घरी गेल्यावर आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर आईने संबंधित शिक्षकाविरोधात पोलिसात फिर्याद दिली.