Thu, Sep 20, 2018 22:55होमपेज › Pune › मांजा बाळगणार्‍यांवर १० गुन्हे दाखल

मांजा बाळगणार्‍यांवर १० गुन्हे दाखल

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 1:43AMपुणे : प्रतिनिधी 

मांजाने शहरातील एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पुणे शहर पोलिसांनी मांजा बाळगणार्‍यांवरील कारवाईची मोहिम तीव्र केली असून, शहरातील सहा पोलिस ठाण्यात 13 जणांवर 10 गुन्हे दाखल केले आहेत. यात एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. 

चायनीज नायलॉन मांजामुळे गळा कापल्याने गंभीर जखमी झालेल्या सुवर्णा मुजुमदार यांचे रविवारी निधन झाले होते. त्या पार्श्‍वभूमीवर याप्रकरणी शहरातील चायनीज मांजा बाळगणार्‍यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेने 7 पथके तयार केली होती. 

गुन्हे शाखेच्या एका पथकाने वाकड येथील दोन व्यापार्‍यांना मांजा बाळगल्याप्रकरणी पकडून त्यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल केले होते़   त्यानंतर शहरातील वारजे, खडक, कोथरुड, स्वारगेट, वाकड, येरवडा या पोलिस ठाण्यांमध्ये आतापर्यंत एकूण 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात 13 जणांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी दिली़ 
शहरात आतापर्यंत दाखल झालेल्या या 10 गुन्ह्यात एकूण 5 जणांना अटक करण्यात आली आहे़  मुंबई पोलिस अ‍ॅक्ट 188 नुसार पोलिसांना अशांवर कारवाई करण्याचा अधिकार आहे़  या गुन्ह्यात 6 महिन्यांपर्यंत कारावास आणि 1 हजार रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते़  त्यामुळे मुले चायनीज मांजा वापरत नाहीत, याकडे पालकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे़  

शहरात चायनीज मांजा विकणारे विक्रेते व चायनीज मांजाचा वापर करुन पतंग उडविणार्‍यांचा पोलिस  शोध घेत आहे़त. नदीपात्रात पतंग उडविणार्‍या मुलांना पकडून आपण त्यांच्याकडील मांजाची तपासणी केली़ परंतु, त्यांच्याकडे साधा मांजा होता़  असे पतंग उडविणाजया 9 मुलांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्या पालकांना बोलावून नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे़  असे शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.