Thu, Feb 21, 2019 15:43होमपेज › Pune › पुणे : उकळते दूध अंगावर पडून चिमुकलीचा मृत्यू

पुणे : उकळते दूध अंगावर पडून चिमुकलीचा मृत्यू

Published On: Jul 31 2018 12:27PM | Last Updated: Jul 31 2018 12:27PMपुणे : प्रतिनिधी

आईने गरम करून ठेवलेले उकळलेले दूध अंगावर पडून जखमी झालेल्या एक वर्षाच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सिंहगड रोड परिसरातील  धायरीत हा प्रकार घडला. भार्गवी कुलकर्णी असे यात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. 

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस तपास करत आहेत. दरम्यान मुलीचे आई-वडील उच्च शिक्षित असून, सहा दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी चिमुकलीचा मृत्यू झाला.