Wed, Jul 17, 2019 10:54होमपेज › Pune › ससूनच्या परिचारिकांना ‘मेस्मा’ लागू

ससूनच्या परिचारिकांना ‘मेस्मा’ लागू

Published On: Jul 09 2018 4:51PM | Last Updated: Jul 09 2018 5:36PMपुणे : प्रतिनिधी

ससून रुग्णालयातील परिचारिकांना ‘महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण कायदा २०११’, (मेस्मा) हा कायदा सहा महिन्यांसाठी लागू करण्यात यावा, असा निर्णय आज विधिमंडळात झाला आहे. त्यामुळे  येथून पुढे संप करणार्‍या परिचारिकांना आता ‘मेस्मा’ लावण्याचा राज्य शासनाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा कायदा लागू करणारे ससून रुग्णालय हे राज्यात पहिले ठरले आहे. यासाठी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी पाठपुरावा केला होता.

काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयातील दहा परिचारिकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. या बदल्यांविरोधात महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन या परिचारिकांच्या संघटनेने ४ जुलै रोजी संप करणार असल्याची नोटीस प्रशासनाला दिली होती. पण यामुळे रुग्णांचे हाल होतील. यामुळे संपाविरुध्द ससूनमधील एका रुग्णाच्या नातेवाईकाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका ३ जुलै रोजी दाखल केली होती. दुसर्‍याच दिवशी संप असल्याने न्यायालयाने तत्काळ सुनावणी घेता, डॉक्टरांप्रमाणेच परिचारिकांनाही ‘महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण कायदा २०११’, कलम ४ (१) (मेस्मा) लागू करण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घ्यावा, असे आदेश दिले. तसेच त्यांच्याशिवाय रुग्णसेवा करता येईल का हा विचार करावा असेही सुचविले होते. 

पण याबाबत वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने काही एक निर्णय दिला नव्हता. दरम्यान पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हा मुद्दा उचलला आणि त्यामध्ये वारंवार संपावर जाणार्‍या परिचारिकांनाही ‘मेस्मा’ लावण्यात यावा याबाबत निर्णय झाला आहे.