Thu, Jul 02, 2020 23:50होमपेज › None › ‘मस्तानी’ शॉर्टफिल्ममधून सामाजिक संदेश

‘मस्तानी’ शॉर्टफिल्ममधून सामाजिक संदेश

Last Updated: May 28 2020 4:15PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

रावणा स्टुडिओ, मुंबई  निर्मित रासम पुष्कर दिग्दर्शित ‘मस्तानी’ शॉर्टफिल्म आपल्या यू-ट्यूब चॅनेल रावणा स्टुडिओज वर प्रदर्शित केली आहे. ह्या फिल्ममार्फत आम्ही समाजातील अनेक घटक आहेत ज्यांच्यापर्यंत ह्या लॉकडाऊनमध्ये कोणीच पोहोचलेले नाही. कोणतीच मदत पोहोचलेली नाही. त्यांचा विचारही कोणी करत नाही. त्यांना कोणतीही मदतही येत नाही, ते कसे जगत असतील, त्यांची अवस्था काय असेल, असे अनेक घटक अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. 

त्यापैकीच एक घटक म्हणजे वेश्या व्यवसाय करणार्‍या महिला. त्या वस्त्यांमध्ये मदत पोहचली का हा प्रश्‍न आहेच, त्या वस्त्यांची तिथल्या महिलांची अवस्था काय असेल कोणीच बघितलेले नाही. त्या महिलांबद्दल त्यांच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न या शॉर्ट फिल्ममधून करण्यात आला आहे.