होमपेज › None › कलम ३७० हटविणे असंवैधानिक : प्रियांका गांधी

कलम ३७० हटविणे असंवैधानिक : प्रियांका गांधी

Published On: Aug 13 2019 6:16PM | Last Updated: Aug 13 2019 6:16PM

संग्रहित छायाचित्रसोनभद्र (उत्तर प्रदेश) : पुढारी ऑनलाईन

उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील उम्मा गावात जमिनीच्या वादातून झालेल्या हत्याकांडातील पीडित कुटुंबीयांची काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आज मंगळवारी भेट घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ३७० कलमावरून केंद्र सरकारवर टिका केली. प्रियांका म्हणल्या की, सरकारने असंवैधानिक मार्गाने ३७० कलम हटविले असून त्यांचा हा निर्णय संविधान विरोधी आहे. सरकारने नियम आणि कायद्यांचे पालन केलेले नाही, असा आरोप त्यांनी केला. 

१९ जुलै रोजी प्रियांका गांधी यांना सोनभद्रला जाण्यापासून रोखण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी धरणे आंदोलन केले होते. आज, मंगळवारी (दि. १३) प्रियांका गांधी यांनी पुन्हा एकदा सोनभद्र येथे येत हत्याकांडातील पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. प्रियांका गांधी म्हणाल्या की, काँग्रेसने अनुच्छेद ३७० बाबत जी भूमिका घेतली आहे तीच माझी भूमिका आहे. अधीर रंजन चौधरी आणि गुलाम नबी आझाद यांनी जे संसदेत म्हटले होते तेच मलाही योग्य वाटते, असेही त्यांनी म्हटले आहे.