होमपेज › None › INDvsWI 3rd ODI : विंडीजला दुसरा धक्का, ख्रिस गेल बाद

INDvsWI 3rd ODI : विंडीजला दुसरा धक्का, ख्रिस गेल बाद

Published On: Aug 14 2019 7:06PM | Last Updated: Aug 14 2019 9:07PM
पोर्ट ऑफ स्पेन : पुढारी ऑनलाईन 

पाहुणा भारत आणि यजमान वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरी वन- डे सुरू झाली आहे. वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासह मालिका जिंकण्याच्या निर्धाराने टीम इंडिया तर मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडविण्याच्या निर्धाराने कॅरेबियन संघ मैदानात उतरले आहेत. दुसरी वन-डे जिंकून कोहली ब्रिगेडने मालिकेत 1-1 अशी आघाडी घेतली आहे. 

अखेरच्या वन-डे सामन्यासाठी भारतीय संघाने कुलदीप यादवला विश्रांती देत युजवेंद्र चहलला संघात स्थान दिलं आहे.

तीन टी-20 सामन्यांची मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकल्यानंतर भारतीय संघाने वन-डे मालिकेतही महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली आहे. बुधवारचा सामना जिंकल्यास आगामी कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा आत्मविश्वास आणखी बुलंद होणार आहे. 

भारतीय संघ : 

शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, केदार जाधव, रविंद्र जडेजा, भूवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, के. अहमद

वेस्ट इंडीजचा संघ : 

ख्रिस गेल, एव्हिन लुईस, शाई होप (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमीयर, निकोलस पूरन, रोस्टन चेस, जेसन होल्डर (कर्णधार), कार्लोस ब्रेथवेट, फॅबियन lenलन, कीमो पॉल, केमार रोच

LIVE UPDATES : 

पुन्हा एकदा पावसामुळे खेळ थांबविण्यात आला आहे. यावेळी विंडीजची धावसंख्या 22 षटकात 158 असून त्यांचे दोन खेळाडू बाद झाले आहेत. 

WI 158/2 (22.0) 

WI 145/2 (18.4)

WI 143/2 (17.5)

WI 135/2 (15.2)

WI 128/2 (14.3)

WI 123/2 (13.0) 

WI 121/2 (12.3) 

विंडीजला सलग दुसरा धक्का बसला आहे. खलील अहमदने धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याला तंबूत पाठविले आहे. कोहलीने त्याचा झेल पकडला. गेलने तडाखेबंद फलंदाजी करत 72 (41) धावा फटकावल्या.  

WI 121/1 (11.3)

WI 115/1 (11.1)

युजवेंद्र चहलने विंडीजला पहिला धक्क देत सलामीवीर एविन लुईसला बाद केले. शिखर धवनने त्याचा झेल पकडला. लुईस 43(29) धावांवर बाद झाला.

WI 113/0 (9.3)

विंडीजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलने भारतीय गोलंदाजांची धुलाई करत अखेरच्या वनडे मध्ये अर्धशतकी खेळी केली आहे. 5 षटकार 7 चौकरानिशी सध्या गेल 64 (32) धावांवर खेळत आहे. एल्वीन लूईसने त्याला तशीच आक्रमक साथ दिली आहे. तो 43 (26) धावांवर खेळत आहे. गेल आणि लुईस यांनी भारतीय गोलंदाजीचा समाचार घेत पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली आहे.

WI 84/0 (8.1)  

WI 49/0 (6.0)  
ख्रिस गेलने आक्रमक पवित्रा घेत 4 चौकार व 2 षटकार ठोकले, त्याला लूईसकदून चांगली साथ मिळत आहे.

WI 13/0 (3.2)

सामना पुन्हा सुरू झाला. 

भारत आणि वेस्ट इंडिज संघादरम्यान सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना पावसामुळे थांबला आहे. 

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजच्या 1.3 षटकात धावा झाल्या आहेत. विंडीजचे ख्रिस गेल आणि एव्हिन लुईस हे सलामीवीर मैदानावर आहेत.