Thu, May 28, 2020 18:12होमपेज › None › काश्मीर मुद्यावरून अमित शहांची पुन्हा खलबते

काश्मीर मुद्यावरून अमित शहांची पुन्हा खलबते

Published On: Aug 19 2019 4:57PM | Last Updated: Aug 19 2019 5:12PM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

जम्मू-काश्मीर मधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयात आज, सोमवारी उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, आयबीचे प्रमुख अरविंद कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. 

कलम ३७० हटवल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निर्बंध लागू केले आहेत. तेथील दुरसंचार आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, शनिवारी (दि. १७) काही भागातील २ जी इंतरनेट सेवा व लँडलाईन सेवा पुन्हा सुरळीत करण्यात आली. पण अनेक भागांमध्ये अफवा पसरवून तेथील परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न झाल्याने काल, रविवारी (दि. १८) पुन्हा एकदा पाच राज्यातील २ जी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. चौदा दिवस उलटल्यानंतरही काश्मीरमधली परिस्थिती पूर्णपणे सामान्य झालेली नाही. अजूनही अनेक भागांमध्ये निर्बंध आहेत. 

काश्मीर खोऱ्यात तणावपूर्ण शांतता असून सुरक्षा बंदोबस्तामुळे अजून कुठले मोठे आंदोलन होऊ शकलेले नाही. काश्मीरमध्ये आजपासून शाळा सुरु झाल्या असल्या तरी मुलांनी त्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. काश्मीरमधल्या या परिस्थितीवर आणि त्यात आणखी काय सुधारणा करता येईल यावर या बैठकीत चर्चा झाली.

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल काश्मीर खोऱ्यातील अनेक भागात फिरुन तेथील नागरिकांशी संवाद साधला. तसेच काश्मीरमधील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भारतील लष्काराच्या जवानांना मार्गदर्शन करून त्यांचे मनोबल वाढवले. काश्मीरमधल्या परिस्थितीचा अहवाल ते दररोज सरकारला पाठवत होते.