Fri, Sep 20, 2019 07:14होमपेज › None › काँग्रेस भरकटली, भूपेंद्र हुडा यांचा काँग्रेसला घरचा आहेर

काँग्रेस भरकटली, भूपेंद्र हुडा यांचा काँग्रेसला घरचा आहेर

Published On: Aug 18 2019 8:28PM | Last Updated: Aug 18 2019 8:28PM

संग्रहित छायाचित्रपानिपत (हरियाणा) : पुढारी ऑनलाईन 

कलम ३७० ला विरोध करणारी काँग्रेस मार्गावरून भरकटली आहे. जुनी काँग्रेस राहिलेली नाही, अशा शब्दांत हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुडा यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. रविवारी रोहतक येथे परिवर्तन रॅलीत ते बोलत होते. 

हुडा म्हणाले, एखादे सरकार चांगले काम करत असेल, तर मी त्याचे समर्थन करेन. माझ्या सहकार्‍यांनी कलम ३७० हटविण्याचा विरोध केला. आमचा पक्ष मार्गावरून भरकटला आहे. राष्ट्रवाद आणि आत्मसन्मानाची गोष्ट असते तेव्हा मी तडजोड करत नाही. काश्मीरबाबतच्या निर्णयात मी केंद्र सरकारसोबत आहे; मात्र हरियाणातील सरकारने ५ वर्षांचा हिशेब द्यावा. 

ते पुढे म्हणाले, राज्यात आमचे सरकार आले, तर स्थानिकांना ७५ टक्के नोकर्‍यांत आरक्षण देऊ. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी हुडा हे स्वतःचा नवीन पक्ष स्थापन करण्याची शक्यता आहे. स्वाभिमान काँग्रेस किंवा स्वराज काँग्रेस असे त्यांच्या पक्षाचे नाव असू शकते.  

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex