Sat, Jun 06, 2020 22:53होमपेज › None › पोलिस उपायुक्ताने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

पोलिस उपायुक्ताने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

Published On: Aug 14 2019 10:53AM | Last Updated: Aug 14 2019 10:37AM

संग्रहित छायाचित्र  फरीदाबाद : पुढारी ऑनलाईन 

फरीदाबादचे पोलिस उपायुक्त विक्रम कपूर यांनी स्वतःवर गोळी झाडून राहत्या घरी आत्महत्या केली. कपूर यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, कपूर यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. तसेच घटनास्थळी फॅारेन्सिक तपासणी सुरु आहे. मागील दोन वर्षांपासुन कपूर यांची फरीदाबाद येथे बदली झाली होती. पुढील वर्षी त्यांचा कार्यकाळ संपणार होता.   

डीसीपी विक्रम कपूर यांनी आज (ता.१४) सकाळी पोलिस लाईनमध्ये आपल्या घरी स्वतःला संपवले. कपूर यांनी आपल्या सर्व्हीस रिव्हॉल्वरमधून सकाळी पावणे सहाच्या सुमारास डोक्यात गोळी घालून घेतली. यावेळी त्यांची पत्नी बाथरूमध्ये होत्या. यावेळी त्या आवाज ऐकून बाहेर आल्या त्यावेळी कपूर यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. कपूर यांना अश्या अवस्थेत पाहून कपूर यांच्या पत्नीने मुलगा अर्जुनला उठवले.   

दरम्यान, घटनास्थळी कोणतीही संशयास्पद चिट्टी मिळाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. विक्रम कपूर मूळचे हे अंबाला येथील आहेत. हरियाणामधून ते पोलिस निरीक्षक म्हणून सेवेत रुजू झाले होते. कालांतराने त्यांची पदोन्नती होऊन आयपीएसपदी निवड झाली. ते मागील दोन वर्षांपासून फरीदाबाद येथे सेवेते होते. 

मागील काही वर्षात पोलिस अधिकारी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, मागील वर्षी ५ सप्टेंबरला कानपुरचे एसएसपी सुरेंद्र कुमार यांनी कौटुंबिक वादातून विष पिऊन आत्महत्या केली होती.