Tue, Mar 26, 2019 08:29होमपेज › None › रॉबर्ट वधेरांच्या सहकारी कंपन्यांवर ईडीकडून छापेमारी

रॉबर्ट वधेरांच्या सहकारी कंपन्यांवर ईडीकडून छापेमारी

Published On: Dec 07 2018 8:21PM | Last Updated: Dec 07 2018 9:05PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

उद्योजक आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वधेरा यांच्या सहकारी कंपन्‍यांवर शुक्रवारी तीन ठिकाणी अंमलबजावणी संचलनालया (ईडी)कडून तीन ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीनंतर वधेरा यांचे वकील सुमन खेतान यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पाच राज्यातील निवडणुकांच्या मतदानानंतर ही छापेमारी करण्यात आल्याने ही कारवाई संभ्रम निर्माण करणारी आहे असे त्यांनी म्‍हटले आहे. 

ईडीकडून उद्योगपती रॉबर्ट वधेरा यांच्या सहकाऱ्यांनी देशभर कंपन्यांचे जाळे उभे केले आहे. या कंपन्यांच्या व्यवहारांशी रॉबर्ट वधेरा यांचा थेट संबंध येत असतो. या कारणामुळेच तीन सहकारी कंपन्यांच्या कार्यालयांवर ईडीने छापे मारले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

दिल्‍लीतील वधेरा यांच्या वकीलांकडूनही या कारवाईवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी ईडीच्या कारवाईनंतर म्‍हटले आहे की, स्‍काइलाईट हॉस्‍पिटॅलिटीच्या आमच्या कर्मचार्‍यांना ईडीच्या कर्मचार्‍यांनी आतमध्येच कोडूंन ठेवण्यात आले आहे. ईडीकडून नाझीवादासारखी कारवाई होत असल्याचा आरोपही त्यांनी केली. गेल्या चार वर्षापासून ही कारवाई सुरू आहे मात्र, त्यांना कोणत्याही पुरावा मिळाला नाही.