Sun, Oct 20, 2019 12:11होमपेज › None › उत्तर प्रदेशमधील माझी सुरक्षा कमी करा : प्रियंका गांधी 

उत्तर प्रदेशमधील माझी सुरक्षा कमी करा : प्रियंका गांधी 

Published On: Jul 18 2019 7:58PM | Last Updated: Jul 18 2019 8:12PM
उत्तर प्रदेश : पुढारी ऑनलाईन

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना काँग्रेसच्या पक्षाच्या  सेक्रेटरी प्रियंका गांधीनी माझी सुरक्षा कमी करावी अशा आशयाचे पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी मी रायबरेली दौऱ्यावर सोनिया गांधी यांच्यासोबत आले होते त्यावेळी 22 वाहनांचा ताफा होता यावेळी लोकांना भेटण्यासाठी मोठे अडथळे निर्माण होत होते. 

या दरम्यान जनतेला मोठा त्रास झाला होता. यावर त्या पुढे म्हणाल्या दुसऱ्या राज्यातील दौऱ्यावेळी माझ्यासोबत फक्त एक वाहनाचा ताफा असतो यामुळे जनतेला भेटण्यासाठी कोणताच अडथळा येत नाही. यामुळे उत्तरप्रदेश मधील शक्य तितकी सुरक्षा कमी करावी. याचा सामान्य जनतेला त्रास होणार नाही. तसेच  सरकारी यंत्रणांचा दुरूपयोग टाळता येईल असेही गांधी यांनी म्हटले आहे.