Sun, Feb 23, 2020 17:52होमपेज › None › अ‍ॅशेस : सामना अनिर्णित राखण्यात ऑस्ट्रेलियाला यश

अ‍ॅशेस : सामना अनिर्णित राखण्यात ऑस्ट्रेलियाला यश

Published On: Aug 19 2019 5:43PM | Last Updated: Aug 19 2019 5:43PM
लंडन : पुढारी ऑनलाईन 

लॉर्डस मैदानावर सुरू असलेली अ‍ॅशेस मालिकेतील दुसरी कसोटी ऑस्ट्रेलियाला अनिर्णित राखण्यात यश आले.जखमी स्टीव्ह स्मिथच्या जागी बदली खेळाडू म्हणून आलेल्या मार्नस लाबुशेनचे अर्धशतक (५९) आणि ट्रेव्हिस हेड (४२*) यांनी टिच्चून केलेल्या फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सामना संपेपर्यंत ६ बाद १५४ धावा केल्या. दोघांनी केलेल्या संयमी खेळीमुळे संघाचा पराभव टळला. या अनिर्णित सामन्यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० ची आघाडी कायम ठेवली आहे.

तत्पूर्वी, बेन स्टोक्सने ठोकलेल्या शतकामुळे इंग्लंडने ऑस्ट्रेलिया समोर २६८ धावांचे लक्ष्य दिले ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने आपलुया भेदक माऱ्याने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची भांबेरी उडवली. आर्चरच्या मा-या पुढे कांगारुच्या फलंदाज टिकू शकले नाही. ४०.६ षटकांमध्ये कांगारुंची अवस्था ६ बाद १४९ अशी होती. त्याचवेळी ट्रेव्हिस हेड याने एक बाजूने किल्ला लढवत संघाला पराभावापासून वाचले. त्याने ९० चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या. इंग्लंडच्या जोफ्रा आर्चर आणि जॅक लीचने प्रत्येकी ३ गडी बाद केले. 

चौथ्या दिवसाच्या ४ बाद ९६ धावसंख्येपासून पुढे खेळत इंग्लंडने सामन्याच्या पाचव्या दिवशी २५८ धावांवर डाव घोषित केला. अष्टपैलू बेन स्टोक्सने १६५ चेंडूत नाबाद ११५ धावांची दमदार खेळी केली. कसोटी करिअर मधील हे त्याचे सातवे शतक आहे. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने ३ गडी बाद केले. 

आर्चर मोडला विक्रम 

सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या दुस-या डावातील ७३ व्या षटकात जोफ्रा आर्चरने सरासरी ताशी १४९ किमी वेगाने मारा केला. त्याने अँड्रयू फ्लिन्टॉफला मागे टाकत २००९ चा विक्रम मोडीत काढला. फ्लिन्टॉफलाने २००९ साली कसोटी सामन्यात सरासरी ताशी १४८ किमी वेगाने मारा केला होता.