आणखी १५० रेल्वे आणि ५० स्थानकांचे खासगीकरण होणार! 

Last Updated: Oct 10 2019 4:59PM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

तेजस ह्या देशातील पहिल्या खासगी सेमी-हाय स्पीड रेल्वेच्या प्रयत्नानंतर केंद्र सरकार आणखी काही गाड्यांचे आणि रेल्वे स्थानकांचे खासगीकरण करण्याच्या तयारीत आहे. केंद्राने देशातील 50 रेल्वे स्थानके आणि 150 गाड्यांचे खासगीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नितिआयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांना लिहिलेल्या पत्रात या सर्व बाबींचा समावेश आहे.

या पत्रात, रेल्वे मंत्रालयाने खासगी ट्रेन चालकांना रेल्वे गाड्या चालविण्यासाठी आणण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच पहिल्या टप्प्यात 150 गाड्या या अंतर्गत घेण्याचा विचार आहे. 50 रेल्वे स्थानकांच्या खासगीकरणाबाबत कांत यांनी रेल्वेमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली असून या प्रकरणाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे कांत यांनी सांगीतले.या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सदस्य, अभियांत्रिकी रेल्वे बोर्ड आणि सदस्य आणि वाहतूक रेल्वे मंडळाला एका समितीत स्थापन करावी लागणार आहे.

तेजसच्या खासगीकरणावरून रेल्वे कर्मचारी संतप्त आहेत. तेजसच्या उद्घाटनाच्या अवघ्या पहिल्या दिवसापासुन हा विरोध सुरू झाला आहे. देशभरातील रेल्वे संघटनांनी या ट्रेनचा निषेध केला आहे. युनियन सदस्यांनी तेजसच्या उद्घाटन वेळी रेल्वेचा काळा दिवस म्हणून घोषित केले. ते म्हणाले की या आम्ही चालवू गाड्या देणार नाही.