Fri, May 29, 2020 03:56होमपेज › None › कुणी तरी आहे तिथे... उडत्या तबकड्या खर्‍या

कुणी तरी आहे तिथे... उडत्या तबकड्या खर्‍या

Published On: Sep 18 2019 9:12PM | Last Updated: Sep 18 2019 9:12PM
न्यू यॉर्क : पुढारी ऑनलाईन 

अमेरिकन नौदलाने गेल्या दोन वर्षांत प्रथमच तीन यूएफओ व्हिडिओच्या मालिकेची सत्यता पडताळणी केली आहे. ते व्हिडीओ खरे असल्याचे अमेरिकन नौदलाचे म्हणणे आहे. तसेच हे फुटेज कधीही सार्वजनिक केले जाऊ नये असा आग्रह धरला आहे. या व्हिडिओंमध्ये असलेल्या वस्तूंना नौदलाने अज्ञात हवाई घटना म्हणून संबोधले असल्याची माहिती ऑपरेशन फॉर इन्फॉरमेशन वॉरफेअर व नौदल उपप्रमुखांच्या प्रवक्ते जोसेफ ग्रॅडिशर यांनी दिली. रहस्ये उघडकीस आणण्यासाठी समर्पित ब्लॅक व्हॉल्ट या संकेतस्थाळाला त्यांनी  ही माहिती दिली. 

ग्रॅडीशर म्हणाले की, ‘यूएपी हा शब्द सैन्य-नियंत्रित प्रशिक्षण श्रेणीच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करत असलेल्या अनधिकृत किंवा अनोळखी विमान-वस्तूंच्या दर्शन व निरीक्षणाचे मूलभूत वर्णन करणा-यासाठी वापरल जातो.’ संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार अमेरिकन नौदलाने आता हे फुटेज “अवर्गीकृत” मानले असून त्याच्या सार्वजनिक प्रसिद्धीस औपचारिकरित्या हिरवा कंदील दिलेला नाही. 

टू स्टार्स अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्स या खासगी संशोधन व माध्यम संस्थेने हे व्हिडिओ प्रसिद्ध केले होते. या फुटेजमुळे त्यानंतर खळबळ उडाली आहे. टॉम डीलेंज हा प्रसिद्ध रॉकर या संस्थेचा को-फाउंडर होता.

एका व्हिडिओमध्ये २०१५ मध्ये अमेरिकन नौदलाच्या दोन वैमानिकांनी पूर्व किनारपट्टीवरून उड्डाण करणा-या अज्ञात वस्तूचा मागोवा घेतला होता.

डिसेंबर २०१७ आणि मार्च २०१८ मध्ये, न्यूयॉर्क टाइम्सने तीन कथितपणे अवर्गीकृत व्हिडिओ अमेरिकन नेव्ही वैमानिकांना काही अज्ञात उड्डाण करणा-या वस्तूंचा मागोवा घेताना प्रसिद्ध केले होते.