भारत-पाकमधील तणाव निवळला : डोनाल्ड ट्रम्प

Published On: Sep 10 2019 8:26PM | Last Updated: Sep 10 2019 8:26PM
Responsive image
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प


वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

काश्मीर प्रश्‍नावरून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात तणाव आहे; परंतु तो कमी होत आहे. दोन आठवड्यांपूर्वी जितका तणाव होता तितका आता नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवादादरम्यान ते बोलत होते. यावेळी, मला भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांची साथ हवी आहे. ना गरज वाटल्यास मध्यस्थीसाठी तयार आहोत, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

२६ ऑगस्ट रोजी जी-७ परिषदेत पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांची भेट झाली होती. त्यावेळी भारत आणि पाकिस्तानदरम्यान असलेल्या कोणत्याही मुद्द्यावर तिसर्‍या देशाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नसल्याचे मोदींनी स्पष्ट केले होते.