जिओ कॉलिंगसाठी मोजावे लागणार पैसे...

Last Updated: Oct 09 2019 8:35PM
Responsive image


मुंबई : पुढारी ऑनलाईन 

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना झटका दिला आहे. आता यापुढे रिलायन्स जिओच्या ग्राहकांनी नॉन जिओ नेटवर्वर कॉलिंग करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. १० ऑक्टोंबरपासून हा निर्णय लागू होणार आहे. 

टेलीकॉम इंडस्ट्रीमध्ये अनेक दिवसांपासून ‘इंटरकनेक्ट यूजेस चार्ज’वरून वाद चालू होता. ट्रायने इंटरकनेक्ट चार्ज शून्य करावेत अशी रिलायन्स जिओची मागणी होती. मात्र, ट्रायने अद्यापही याबाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे जिओने मोठा निर्णय घेत नॉन जिओ नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी ग्राहकांना मिनिटाला ६ पैसे मोजावे लागतील असे जाहीर केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १० ऑक्टोंबर म्हणजेच उद्यापासूनपासून ते १ जानेवारी २०२० पर्यंत होणार आहे. 

रिलायन्स जिओ व्यतिरिक्त दुस-या नेटवर्कवर कॉल करयचा असेल तर, जिओच्या ग्राहकांना आता अतिरिक्त आयसीयु टॉपअप करावा लागणार आहे. मात्र, जिओ टू जिओ तसेच लँडलाइनवर कॉलिंगमोफत राहणार आहे. 

जिओकडून दिलेल्या माहितीनुसार, ट्रायकडून जो पर्यंत टर्मिनेशन चार्ज शुन्य केला जात नाही तो पर्यंत जिओच्या ग्राहकांना कॉलिंगसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.'रोहितने माझ्या 'त्या' आठवणींना उजाळा दिला'


शिक्षकांचा सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार


उस्मानाबाद : पिक विम्यासाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून कृषी कार्यालयात तोडफोड


जे. पी. नड्डा भाजपचे नवीन अध्यक्ष; बिनविरोध निवड


बीड : टीईटी परीक्षेत गोंधळ; उत्तराचे पर्याय गायब


'चांद्रयान २' सॉफ्ट लँडिंगचा पीएम नरेंद्र मोदींकडून उल्लेख


भारतातील एक टक्के श्रीमंताकडे ७० टक्के लोकांपेक्षा जास्त संपत्ती 


विद्यार्थ्यांनी झुंजार वृत्तीच्या अनिल कुंबळेचा आदर्श घ्यावा : पंतप्रधान मोदी


औरंगाबाद जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे आंदोलन 


नागराज मंजुळेच्या 'झुंड'ची झलक पाहाच