Fri, May 29, 2020 03:54होमपेज › None › 'सरकार जबाबदारीपासून पळ काढत आहे'

'सरकार जबाबदारीपासून पळ काढत आहे'

Published On: Sep 17 2019 8:40PM | Last Updated: Sep 17 2019 8:40PM

फाइल फोटो : कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वधेरानवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

आर्थिक मंदीवरून विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर हल्ले सुरूच आहेत. मंगळवारी वाहन उद्योगातील मंदीबाबतच्या बातमीचा हवाला देत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वधेरा यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधताना सरकार जबाबदारीपासून पळ काढत असल्याचा आरोप केला. त्या लेखात वाहन उद्योगातील महिंद्रा कंपनी १७ दिवस त्यांचा प्लांट बंद ठेवणार असल्याचे म्हटले आहे. 

प्रियांकांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, भाजप सरकारला फक्‍त एवढेच सांगणे आहे की, इकडच्या तिकडच्या गप्पा मारून लुटीच्या जबाबदारीपासून पळ काढणे त्यांना महागात पडणार आहे. लोक पाहत आहेत. आणखी एक कंपनी मंदीच्या कचाट्यात आली आहे. आणखी लोक बेरोजगार होणार आहेत, अशा शब्दांत प्रियांकांनी टीकास्त्र सोडले.