Mon, Jan 27, 2020 12:29होमपेज › None › आता चंद्रावर जाणार पहिली ‘महिला अंतराळवीर’

आता चंद्रावर जाणार पहिली ‘महिला अंतराळवीर’

Published On: Jul 23 2019 12:06AM | Last Updated: Jul 23 2019 12:05AM
वॉशिंगटन : पुढारी ऑनलाईन 

१६ जुलै १९६९ रोजी अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने ‘अपोलो ११’ हे मानवरहित यान चंद्रावर पाठविले. त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजेच २० जुलै रोजी प्रथमच माणसाने चंद्राच्या पृष्ठभागावर पाय ठेवले. या ऐतिहासिक घटनेला नुकतीच ५० वर्षे पूर्ण झाली. या घटनेची पन्नाशी पूर्ण होते ना होते तोच सोमवारी (२२ जुलै) भारताने चांद्रयान २ चे चंद्राच्या दक्षिण धृवाकडे यशस्वी प्रक्षेपण केले. दरम्यान, अमेरिकेच्या नासाने लागलीच आपल्या चांद्र मोहिमेविषयी नवीन घोषणा करत चंद्रावर पहिल्यांदा महिलेला पाठाविण्यात येणार व त्यानंतर पुरुषाला पाठविले जाईल, असे जाहीर केले. या मोहिमेला ‘आर्टेमिस’ असे नाव देण्यात आले आहे. नासाने आपल्या ट्विटर अकौंटवरून याची प्रसिद्ध केली आहे. 

नासाच्या म्हणण्यानुसार, नासाच्या मंगळ मोहिमेमध्ये आर्टेमिस ही चांद्र मोहीम महत्त्वाची भूमिका निभावेल. मंगळ ग्रहाकडे जाणारा मार्ग आर्टेमिस मोहीम निर्माण करेल. या मोहीमे अंतर्गत अंतराळवीर चंद्राच्या अज्ञात प्रदेशाचा शोध लावतील, ज्या ठिकाणी अद्याप कोणीच पोहोचू शकलेले नाही. विश्वाचे रहस्य उलगडताना ते  अशा तंत्राचे परिक्षण करतील, ज्याने सुर्यमालेतील मनुष्याच्या सीमा विस्तारतील. 

चंद्राच्या पृष्ठ भागावर आम्ही पाणी, बर्फ आणि अन्य नैसर्गिक संसाधनांचा शोध लावणार आहे. जेणेकरून भविष्यात अंतराळामध्ये खूप पुढेपर्यंत प्रवास करता येणे शक्य होईल. नासाच्या आर्टेमिस चांद्र मोहीमेसाठी जवलपास ३० अब्ज डॉलर इतका खर्च येणार आहे. १९ ६१ मध्ये प्रारंभ झालेले आणि १९७२ साली समाप्त करण्यात आलेल्या अपोलो सिरीज मोहीमेचा २५ अब्ज डॉलर इतका खर्च आला होता. २०२२ ते २०२४ दरम्यान पाच मोहीमा राबविल्या जाणार आहेत. या खासगी कंपन्याद्वारे संचालित केल्या जातील, अशी माहिती नासाने दिली आहे.  

भारताच्या मानवरहित यान ‘गंगायान’ मोहिमेची प्रमुख महिलाच...

इस्रोने चांद्रयान-२ मोहिमेची घोषणा केल्यानंतर लगेच अवकाशात मानव यान सोडण्याची घोषणा केली आहे. पण, ही मोहीम प्रत्यक्षात उतरायला २०२२ उजाडणार आहे. त्या मोहिमेची तयारी आतापासूनच करण्यात येत आहे. या मोहिमेत तीन अवकाशवीर सहभागी होणार आहे. यातील एक महिला असणार आहे. या मोहिमेला गंगायान असे नाव देण्यात आले असून या मोहिमेच्या प्रमुख म्हणून व्ही. आर. ललितांबिका करत आहेत. गंगायान नॅशलन अॅडव्हायजरी कौन्सिलच्या माध्यमातून संपूर्ण मोहिमेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.