Wed, Nov 13, 2019 12:29होमपेज › None › झाकीर नाईक याला भारतात पाठवण्याची मलेशियाच्या मंत्र्याची मागणी 

झाकीर नाईक याला भारतात पाठवण्याची मलेशियाच्या मंत्र्याची मागणी 

Published On: Aug 14 2019 7:43PM | Last Updated: Aug 14 2019 7:43PM

संग्रहित छायाचित्रक्‍वालालंपूर (मलेशिया) :  पुढारी ऑनलाईन  

मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईक याला भारताच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी मलेशियाचे मानव संसाधन विकासमंत्री एम. कुलसेगरन यांनी केली आहे. बुधवारी होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणावर निर्णय होऊ शकतो. 

झाकीर तीन वर्षांपासून मलेशियात राहत असून, मनी लाँड्रिंग आणि दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 

कुलसेगरन यांनी एक पत्र प्रसिद्ध केले असून त्यामध्ये म्हटले आहे की, मलेशियन करदात्यांच्या पैशांवर झाकीर येथे मौजमजा करत आहे. त्याच्यावर गंभीर आरोप आहेत. तो मलेशियात सामूदायिक द्वेष पसरवण्याचा कट रचत आहे. त्याला भारताच्या ताब्यात द्यावे. झाकीरसारख्या लोकांना आमच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीत राहण्याचा अधिकार नाही. त्याला मलेशियाचे स्थायी नागरिकत्व कदापि दिले जाणार नाही. 

दरम्यान, मलेशियाचे पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांनी पूर्वीच नाईकच्या जीवास धोका असल्याच्या कारणावरून प्रत्यार्पणास विरोध केला आहे. जर दुसरा कोणता देश त्याला आश्रय देणार असेल तर आम्ही तयार आहोत, असे महाथीर यांनी म्हटले आहे.