Sat, Dec 07, 2019 15:13होमपेज › None › भारतीय नेमबाज अनिश भानवालाचा ‘सुवर्णवेध’

भारतीय नेमबाज अनिश भानवालाचा ‘सुवर्णवेध’

Published On: Jul 17 2019 10:15PM | Last Updated: Jul 17 2019 10:15PM
सुहल (जर्मनी) : पुढारी ऑनलाईन 

आयएसएसएफ (आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट फेडरेशन) ज्यूनिअर विश्वचषक स्पर्धेत भारताचा नेमबाज अनिश भानवाला याने २५ मीटर रॅपीड फायर पिस्टल स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. जर्मनीमधील सुहल शहरात ही स्पर्धा खेळवली जात असून भानवाला याने ५८४ गुणांची कमाई केली. 

रशियाच्या इगोर इस्माकोव्हने रौप्य पदक, तर जर्मनीच्या फ्लोरियन पीटरने कांस्यपद मिळाले. 

स्पर्धेत सहभागी झालेल्या अन्य दोन भारतीय खेळाडू आदर्श सिंह, अग्निया कौशिक यांना अनुक्रमे चौथ्या व सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. 
आयएसएफएफ जूनियर विश्वचषक स्पर्धेत भारताने आतापर्यंत आठ सुवर्ण, सात रौप्य आणि तीन कांस्यपदकांची कमाई केली आहे.