Fri, May 29, 2020 02:53होमपेज › None › पीएम मोदी 'की ऑफ ह्युस्टन' पुरस्काराने सन्मानित

पीएम मोदी 'की ऑफ ह्युस्टन' पुरस्काराने सन्मानित

Published On: Sep 22 2019 10:35PM | Last Updated: Sep 22 2019 10:35PM
न्यूयॉर्क : पुढारी ऑनलाईन

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या ह्युस्टन शहरात हाउडी मोदी कार्यक्रमात पोहोचले आहेत. एनआरजी स्टेडियमवर हजारो भारतीय नागरिक उपस्थित आहेत. आज या रॅलीची सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रमांनी झाली. यावेळी पीएम मोदी यांना 'की ऑफ ह्युस्टन' पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. 

यावेळी उपस्थित अमेरिका सरकारच्या प्रतिनिधीने आपल्या संबोधनात म्हटले की, अमेरिका भारताला विश्वासू मित्र म्हणून पाहतो. अमेरिकेत भारतीय नागरिकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असून दोन्ही देशांमधील संबंध खूप चांगले झाले आहेत. अमेरिकेच्या जडणघडणीत भारतीय लोकांनी मोठे योगदान दिले आहे. भारत वेगाने विकसित होत आहे आणि प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर पोहोचले आहेत. अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन्ही नेते 'हाउडी मोदी' या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली असून ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. या कार्यक्रमात ५० हजारांहून अधिक भारतीय समुदायाची लोक सहभागी होणार असून मोदी आणि ट्रम्प हे दोन नेते यावेळी संबोधित करणार आहेत.