होमपेज › None › मनमोहन सिंग यांचा राज्यसभेसाठी अर्ज 

मनमोहन सिंग यांचा राज्यसभेसाठी अर्ज 

Published On: Aug 13 2019 6:37PM | Last Updated: Aug 13 2019 6:37PM

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मंगळवारी राज्यस्थानातून राज्यसभा सदस्यत्वासाठी अर्ज दाखल केला.जयपूर : पुढारी ऑनलाईन

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मंगळवारी राज्यस्थानातून राज्यसभा सदस्यत्वासाठी अर्ज दाखल केला. या वेळी त्यांच्यासोबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट उपस्थित होते. 

मंगळवारी सकाळी मनमोहन सिंग जयपूरला आले. भाजप प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांच्या निधनानंतर रिक्‍त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर 26 ऑगस्टला पोटनिवडणूक होणार आहे. संख्याबळामुळे काँग्रेसला पूर्ण विश्‍वास आहे. त्यामुळे मनमोहन सिंग यांचा विजय नक्‍की मानला जात आहे. 

मनमोहन सिंग यांचा राज्यसभेचा कार्यकाल १४ जूनला संपुष्टात आला होता. ते आसाममधून राज्यसभेवर निवडून गेले होते.