होमपेज › None › 'देश कठीण काळातून जात आहे'

'देश कठीण काळातून जात आहे'

Last Updated: Jan 09 2020 3:33PM

सरन्यायाधीश शरद बोबडेनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनावरून तीव्र चिंता व्यक्त केली. सध्या देश कठीण काळातून जात आहे सर्वानी शांततेसाठी प्रयत्न करायला हवे. सरन्यायाधीश बोबडे पुनित कौर ढांडा यांच्यावतीने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान बोलत होते. या याचिकेवर लवकरच सुनावणी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

अधिक वाचा : CAA संबंधित सर्व खटले सर्वोच्च न्यायालयात वर्ग करा : केंद्र 

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत अफवा पसरवणाऱ्या तसेच मीडिया हाऊसेसच्या विरोधात कारवाई करण्यात यावी. सीएए कायद्याला संवैधानिक घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर सरन्यायाधीश बोबडे यांनी अशा प्रकारच्या याचिका यासाठी मदत करू शकत नसल्याची प्रतिक्रिया दिली. ज्यावेळी हिंसाचाराचे प्रकार थांबतील त्यानंतर सुनावणी करण्यात येईल, याचबरोबर भारतीय नागरिकत्व विधेयक हे संसदेत संमत झाले आहे यासाठी आम्ही कसे संवैधानिक ठरवणार. संसदेत झालेला कायदा हा संवैधानिकच मानला जातो. जर आपण कायद्याचे विद्यार्थी असाल तर आपणास याबाबत कल्पना असने गरजेचे आहे. असेही सरन्यायाधीश बोबडे म्हणाले.  

अधिक वाचा : टीचरकडून विद्यार्थीनींच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पेन्सिलचा वापर; व्हिडिओ बॉयफ्रेंडला पाठवला

दरम्यान देशभरात नागरिकत्व दुरूस्ती विधेयक विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. सीएए-एनआरसी विरोधात भाजपचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वखालील महात्मा गांधी शांती यात्रेचे गुरुवार (ता. ९) गेट वे ऑफ इंडिया येथून प्रारंभ होत आहे. ही यात्रा मुंबईपासुन ते दिल्ली असा ३ हजार किलोमीटर प्रवास करत निघणार आहे. महाराष्ट्र, गुजरात,  राजस्थान, उत्तरप्रदेश आणि हरियाणा या राज्यातून ३० जानेवारीला दिल्लीतील राजघाटावर समारोप होणार आहे.