Tue, Sep 17, 2019 22:27होमपेज › None › दंगल घडविल्याप्रकरणी भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर यास अटक

दंगल घडविल्याप्रकरणी भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर यास अटक

Published On: Aug 22 2019 5:59PM | Last Updated: Aug 22 2019 5:59PM

भीम आर्मी संघटनेचा प्रमुख चंद्रशेखर आझादनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

दिल्लीतील तुघलकाबाद परिसरात दंगल घडविल्याप्रकऱणी भीम आर्मी संघटनेचा प्रमुख चंद्रशेखर आझाद यास अटक करण्यात आली आहे. संत रविदास यांचे मंदिर पाडल्याच्या विरोधात संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आला होता, त्यावेळी जमावाने तोडफोड, जाळपोळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

दिल्लीतील तुघलकाबाद परिसरातील संत रविदास यांचे मंदिर पाडल्याच्या विरोधात भीम आर्मी या संघटनेने आंदोलन चालविले आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी हिंसक होत तोडफोड आणि जाळपोळ सुरू केली. दिल्ली परिवहन कॉर्पोरेशनच्या बस, तसेच परिसरातील चारचाकी गाड्या व मोटारसायकलदेखील जाळण्यात आला. आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न पोलीसांनी केला असता पोलीसांवरच हल्ल करण्यात आला. त्यामध्ये १५ पोलीस जवान जखमी झाले. अखेर पोलीसांनी भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद याच्यासह जवळपास ८० आंदोलनकर्त्यांना अटक केली.

दरम्यान, काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी - वाड्रा यांनी या अटकेचा निषेध केला आहे. दलितांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असून ते सहन केले जाणार नाही, असे ट्वीट त्यांनी केल आहे. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex