Thu, Aug 22, 2019 15:28होमपेज › National › हत्तीऐवजी चुकून दाबले कमळासमोरील बटण, प्रायश्चित म्‍हणून कापले बोट 

हत्तीऐवजी चुकून दाबले कमळासमोरील बटण, प्रायश्चित म्‍हणून कापले बोट 

Published On: Apr 19 2019 11:34AM | Last Updated: Apr 19 2019 11:34AM
उत्‍तर प्रदेश : पुढारी ऑनलाईन 

राजकारणात राजकीय नेते जरी आपल्‍या फायद्‍यासाठी या पक्षातून त्‍या पक्षात उड्‍या मारत असले, तरी कार्यकर्ते मात्र आपल्‍या पक्षाच्या आणि नेत्‍याच्या बाबतीत प्रामाणिक असतात. त्‍यामुळे बर्‍याच वेळा त्‍यांचे हे अति पक्षप्रेम कधी कधी त्‍यांच्याच मुळावर येते. असेच पक्ष प्रेम एका कार्यकत्‍यांच्या बोटावर उलटल्‍याची घटना समोर आली आहे. कारण आपल्‍या आवडता पक्ष आणि उमेदवाराऐवजी चुकून दुसर्‍या पक्षाच्या उमेदवारासमोरील बटण दाबले गेल्‍याचे लक्षात आल्‍याने रागाच्या भरात या तरूणाने आपले बोटच कापून टाकले. ही घटना उत्‍तर प्रदेशच्या शिकारपूर मतदारसंघात घडल्‍याचे समोर आले आहे.

त्‍याचे झाले असे की, उत्‍तर प्रदेशातील शिकारपूर मतदारसंघात अब्‍दुल्‍लापूरचा रहीवासी असलेला पवन कुमार (वय २४) हा बसपाचा समर्थक आहे. गुरूवारी मतदानासाठी तो गावातील मतदार केंद्रात आला होता. यावेळी घाईगडबडीत त्‍याने आवडत्‍या उमेदवाराच्या हत्‍ती या चिन्हा ऐवजी कमळाचे बटण दाबले. मात्र ही गोष्‍ट त्‍याला लक्षात आल्‍यावर काही अपयोग नव्हता कारण तोपर्यंत त्‍याचे बहुमोल मत त्‍याच्या आवडत्‍या पक्षाऐवजी दुसर्‍या पक्षाला गेले होते. मग स्‍वत:च्याच चुकीचा या तरूणाला इतका राग आला, की त्‍याने स्‍वत:चे बोटच धारदार शस्‍त्राने कापून टाकले. 

स्‍वत:ला बसपा समर्थक असल्‍याचे सांगणार्‍या तरूणाच्या या कृत्‍यानंतर कुटुंबियांनी या तरूणाला रूग्‍णालयात नेले. डॉक्‍टरांनी त्‍याच्यावर उपचार करून त्‍याला घरी सोडले आहे.