जगाची महामंदीच्या दिशेने वेगाने वाटचाल

Last Updated: Mar 30 2020 1:05AM
Responsive image


नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे जगभरातील अनेक देशांची अर्थव्यवस्था खिळखिळी होत आहे.  अमेरिका, जपानबरोबरच भारतालाही  त्याचा फटका बसला आहे. कोरोनावर लवकरच नियंत्रण मिळविण्यात यश न आल्यास जगाचा विकास दर 5 टक्क्यांवर थांबून 3 ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिकचे नुकसान होऊ शकते, असा अंदाज जगभरातील अर्थतज्ज्ञ व्यक्‍त करीत आहेत. एकूणच जगाची वाटचाल महामंदीच्या दिशेने सुरू झाली आहे.

जगभरातील अर्थव्यवस्थांवर कोरोनाचा किती परिणाम होईल, हे महामारी किती काळ टिकते त्यावर अवलंबून असणार आहे. चीनमध्ये ज्याप्रमाणे ही महामारी अधिक काळ टिकली, तसेच इतर देशांत झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. कोरोनाच्या फटक्यामुळे खाण्या-पिण्याच्या वस्तू (कंज्युमर गुडस्) आणि ऊर्जा क्षेत्रातील मागणीत घट होईल. उत्पादन थांबेल, कंपन्या बंद पडतील. दुकानांपर्यंत वस्तूपुरवठाच न झाल्यामुळे त्यांच्या किमती वाढतील, या भीतीपोटीच अमेरिका, चीन, फिलिपाईन्ससह भारतानेही करकपातीचा मार्ग अवलंबला आहे. चीन बाजारात मोठ्या प्रमाणात पैसा ओतत आहे, ज्यामुळे ग्राहकांना कर्ज घेणे सोपे होईल. अशाच प्रकारे जपानही तांत्रिकद‍ृष्ट्या मंदीच्या गर्तेत जाऊ शकतो. 

भारतावर काय होणार परिणाम?

भारतीय अर्थव्यवस्था आधीच मंदीसद‍ृश परिस्थितीशी सामना करीत होती. त्यात किंचित सुधारणा होत असतानाच कोरोनाचा कहर सुरू झाला. आता कोरोनाचा प्रसार जास्त झाल्यास त्याचा नकारात्मक परिणाम अनेक क्षेत्रांवर दिसून येईल. असे असले तरी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात विकासाची गती वाढेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

उत्पादन आणि ट्रॅक्टर विक्रीचे आकडे यंदा चांगले आले आहेत; परंतु कोरोनामुळे त्यालाही मोठा फटका बसू शकतो. शेअर बाजारात अभूतपूर्व घसरण अनुभवायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या सर्वकालिक किमतीवर असणारे अनेक कंपन्यांचे शेअर्स सध्या दहा टक्क्यांपेक्षाही जास्त घसरले आहेत. भारतातील अनेक कंपन्या कच्च्या मालाच्या बाबतीत चीनवर अवलंबून आहेत. तेथील परिस्थिती लवकर पूर्ववत झाल्यास भारतीय अर्थव्यवस्थाही गतीने पूर्वपदावर येऊ शकते.articleId: "185565", img: "Article image URL", tags: "world will move faster towards the Great Depression",