Tue, Oct 24, 2017 16:49होमपेज › National › जगभरातील महिलांचा ट्विटरवर बहिष्कार 

जगभरातील महिलांचा ट्विटरवर बहिष्कार 

Published On: Oct 13 2017 4:42PM | Last Updated: Oct 13 2017 4:42PM

बुकमार्क करा

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

एखाद्या सोशल मीडिया वेबसाईटवर त्याच वेबसाईटवर बहिष्कार टाकण्याचा हॅशटॅग ट्रेंडमध्ये येवू शकतो का? याचे उत्तर तुम्ही नाही असे द्याल. पण सध्या ट्विटरवर #WomenBoycottTwitter हा हॅशटॅग सुरू आहे. हा हॅशटॅग वापरून जगभरातील अनेक महिला ट्विटर वापरणे बंद करत आहेत. 

का सुरु झाली मोहीम

या मोहीमेची सुरूवात अमेरिकामध्ये झाली आहे. पण ही मोहीम अमेरिकेपुरतीच मर्यादीत न राहता आता जगभर पसरली आहे. हा #WomenBoycottTwitter हॅशटॅग हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रोज मॅकगोवन हिने सुरू केला आहे. फक्त महिलाच नाही तर पुरूषदेखील या मोहिमेला पाठिंबा देत आहेत. या मोहिमेमध्ये १३ ऑक्टोबर रोजी सर्व महिला   

काय आहे या हॅशटॅगच्या मागचे प्रकरण 

चित्रपट दिग्दर्शक हार्वी वाइंसटाइन यांनी १९९७ मध्ये माझ्यावर बलात्कार केला होता, असा खळबळजनक आरोप रोजने ट्विटरवरून केला होता.  रोजने १२ ऑक्टोबर रोजी याच प्रकरणाशी संबंधित ट्विट्स केले होते. 

इंस्टाग्रामवर टाकले स्क्रिनशॉट

यानंतर ट्विटरने रोजचे अकाऊंट १२ तासांसाठी बंद केले होते. तसेच रोजने केलेल्या ट्विट्सवर आक्षेप घेत ते ट्विट काढून टाका, असे सांगण्यात आले होते. याच विरोधात रोजने ही मोहिम सुरू केली आहे. ट्विटरकडून पाठवण्यात आलेल्या संदेशाचा स्क्रिनशॉट रोजने इंस्टग्रामवर शेअर केला आहे. 

dinsta