Mon, Aug 26, 2019 15:34होमपेज › National › पुढील वर्षी सूर्याला गवसणी 

पुढील वर्षी सूर्याला गवसणी 

Published On: Jul 23 2019 1:36AM | Last Updated: Jul 23 2019 1:35AM
नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने सोमवारी चंद्रयान-2 चे यशस्वी प्रक्षेपण केले, त्याचबरोबर पुढील वर्षी म्हणजेच 2020 च्या मध्यात सूर्याच्या बाह्यमंडलाचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-1 हे यान अंतराळात सोडणार असल्याची घोषणा केली आहे. सूर्याच्या बाह्यमंडलास तेजोमंडल संबोधले जात असून ते हजारो किलोमीटरपर्यंत विखुरले आहे. तेजोमंडलाच्या तप्तपणाचे गूढ उकलण्यात भौतिकशास्त्रज्ञांना अद्यापही यश आलेले नाही. त्यासाठीच इस्रोने आपले पुढील लक्ष्य सूर्यावर केेंद्रित केले आहे.

आदित्य एल-1 सूर्याच्या फोटोस्पेयर, क्रोमोस्पेयर आणि तेजोमंडलचा अभ्यास करणार आहे. सूर्यातून बाहेर पडणार्‍या स्फोटक कणांचा अभ्यासही करणार आहे. हे कण निरुपयोगी असल्याने त्यांचा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातील प्रवेश अनावश्यक असल्याचे इस्रोने म्हटले आहे.